शिक्षक, पदवीधर मतदारसंघ वगळून आचारसंहिता संपुष्टात

| रायगड | प्रतिनिधी |

लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

राज्यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version