हुडहुडी वाढू लागली; मुंबईसह राज्याच्या पार्‍यात घट

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळं हुहहुडी चांगलीच वाढली आहे. मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाच्याखाली गेलं आहे. याचबरोबर मराठवाड्यासह विदर्भ पश्‍चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे.

धुळे जिल्ह्यातही तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळं तिथे कडाक्याची थंडी पडली आहे. धुळे शहरासह जिल्ह्याचे 10 अंशापर्यंत आलेलं तापमान आज 8.4 वर आलं आहे. परभणीतही पारा घसरला. थंडीमुळं ग्रामीण भागासह शहरात शेकोट्या पेटत असून नागरिक।उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत.

मुंबईत सर्वात कमी तापमान
दरम्यान, मुंबईत यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील यंदाच्या मौसमात पहिल्यांदाच किमान तापमान 20 अंशाखाली गेलं आहे. उद्या देखील मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे. ख्रिसमसनंतर म्हणजे 25 डिसेंबरनंतर मुंबईत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. मराठवाड्यात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. तिथे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडं पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातही तापमानात घट झाली आहे.

Exit mobile version