सर्वसामान्यांनी केली नालेसफाईची मागणी

। नेरळ। प्रतिनिधी।

कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीतील नाल्यांची अद्याप सफाई झालेली नाही. नेरळ ग्रामपंचायतमध्ये तीन प्रमुख नाले असून त्या सर्वांचे पाणी शेवटी उल्हास नदीला जाऊन मिळते. त्यामुळे नाल्यांमधील झाडे झुडपे आणि जलपर्णी या पावसाच्या पाण्यासोबत वाहून उल्हास नदीमध्ये जाण्याची शक्यता आहे.

नेरळ ग्रामपंचायत हि माथेरानच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे माथेरानच्या डोंगरातून वाहणारे पाणी हे वेगवेगळ्या ओढ्यामधून नेरळ गावातून वाहत जात असते. त्यातून नेरळ गावात असलेले तीन प्रमुख नाले असून ते नाले आज कचर्‍याने भरून गेले आहेत. सर्व नाल्यांमध्ये कचर्‍यासोबत झाडे झुडपांची गर्दी देखील आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याआधी त्या सर्व नाल्यांची सफाई झाली नाही तर नाल्यांमधील सर्व कचरा हा पावसाच्या पाण्यात वाहून उल्हास नदीत जाऊन उल्हास नदीचे प्रदूषण वाढणार आहे. त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीकडून गावातील नाल्यांची सफाई व्हावी, अशी सर्व सामान्यांची अपेक्षा आहे.

त्यामुळे या नाल्याची सफाई नेरळ ग्रामपंचायत करणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे. परंतु नाल्यांची सफाई करणायचे नियोजन असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी दिली आहे.

Exit mobile version