माथाडी कामगारापुढे कंपनी प्रशासन नमले

बेमुदत उपोषण स्थगित

| खोपोली | वार्ताहर |

तांबाटी येथील ओके प्रिंट अँण्ड पॅक कंपनीतील माथाडी कामगारांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत कंपनी व्यवस्थापनाने नमते घेतले. 50 किलो पेक्षा जास्तीचे वजन उचलवणे अमानवीय आहे. कामगारांना कंपनीच्या आवारामध्ये बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच अत्यावश्यक सेवा या कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणाच्या विरोधात माथाडी कामगारांनी उपोषण कंपनीच्या गेट समोर सुरू केले होते. तर येथील कामगारांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र जनरल श्रमिक कामगार संघ ठाम राहिली असता अखेर कंपनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत सर्व मागणी पूर्ण केल्याने उपोषणाला अखेर स्थगिती देण्यात आल्याने कामगारांनी आनंद व्यक्त करत कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत समाधान व्यक्त केले.

यावेळी नितीन सावंत, कैलास म्हात्रे, गौरव नालीदे, संजय गायकवाड, पियुश नालकाडे, नंदकिशोर मयेकर, विलास कदम, सुप्रीम सुर्वे, अंकुश भागित, जयानद सावंत, चिटणीस कैलास फराट, कोकण विभाग अध्यक्ष समीर चव्हाण, संतोष देशमुख, निखिल पाटील, महेश पाटील, अशोक मराजगे, संगम जाधव, प्रणाल लाले, अंकुर बामणे, विशाल म्हामुनकर, कैलास पाटील आदी प्रमुखासह खालापूर तालुक्यातील नागरिक व कामगार उपस्थित होते. प्रवीण फराट, प्रतीक फराट, अजित ठोंबरे, जयेश मगर, सुरेश भडकले, यशवत मुंडे, राजेश पाटील हे सात कामगार उपोषणासाठी बसले आहे.

Exit mobile version