| म्हसळा | प्रतिनिधी |
बौद्ध समाज बौध्दजन पंचायत समिती म्हसळा व भारतीय बौद्ध महासभा तालुका म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेल्या भारतीय संविधानाच्या गौरवार्थ भारतीय संविधान गौरव दिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त रॅली काढून तमाम म्हसळावासियांकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात शाहिर भीमराव सूर्यतळ यांच्या संविधान गीताने करण्यात आली. संविधानावर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थित संविधान अभ्यासक प्रशांत गमरे, कार्यक्रम अध्यक्ष सुरेश जाधव, प्रांताधिकारी महेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, तहसीलदार सचिन खाडे, म्हसळा पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, गटविकास अधिकारी माधव जाधव, नगरपंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, गट शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत बिराजदार, वन अधिकारी पी.एम. पाटील, कृषी अधिकारी एस.डी. शिंदे, युवा उद्योजक सुशांत मोरे, समीर बनकर, सुरेश कुडेकर, महादेव पाटील, बबन मनवे, शाहीद उकए, जमादार सर, सूर्यकांत तांबे, चंद्रकांत पवार, मनोहर तांबे, सुमित सावंत, शाहिर भीमराव सूर्यतळ, संतोष जाधव, शशिकांत शिर्के, तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पोलीस प्रशासनानेदेखील उत्तम सहकार्य केले.
संविधान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 128;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;