| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील जामरुंग येथील मालकीच्या बिनशेती भूखंडावर दोन बंगले बांधण्याचे काम संबंधित जमीन मालकाने मुब्रा ठाणे येथील ठेकेदाराला दिले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने आर्थिक गफला करताना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करून दिले नाही, त्यामुळे संबंधित जमीन मालकाने त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जामरंग या गावाच्या हद्दीत नवी मुंबई येथील जमीन मालकाचे बिनशेती प्लॉट आहेत. त्यातील सर्व नंबर 263 मधील प्लॉट नंबर 47 आणि 48 मध्ये फार्म हाऊस करीत बंगले बांधण्यात येणार होते. ते बंगले बांधण्याचे काम संबंधित ठेकेदाराने ठाणे मुंब्रा येथील बांधकाम ठेकेदाराला दिले होते. त्या कामाचे बयाना म्हणून 10 हजार रुपये जमीन मालकाने कंत्राटदार याला दिले होते. मात्र ठरल्याप्रमाणे बंगले बांधण्याचे काम ठरवून दिलेल्या जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत पूर्ण केले नाही आणि आर्थिक फसवणूक केली. त्याबद्दल संबंधित जमीन मालकाने कर्जत पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. कर्जत पोलिसांनी सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती घेवून गुन्हा दाखल केला आहे.