रस्त्यांचे नामकरण करताना ‘त्या’ व्यक्तींचे माथेरानसाठी योगदान महत्त्वाचे

माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरान हे एक सुंदर पर्यटनस्थळ असून दरवर्षी लाखो पर्यटकांची इथे आवर्जून हजेरी असते. सन १८५० च्या दशकात स्थापन करण्यात आलेल्या या ठिकाणाला ब्रिटिश राजवटीत एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आजही कायम आहे. मुंबई पासून अगदी जवळचे ठिकाण असल्याने एकप्रकारे हे स्थळ पर्यटकांसाठी वरदान ठरले आहे अनेकांना या छोट्याशा ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. इतकेच नव्हे तर तालुक्यातील असंख्य परिवार याच स्थळावर आजही अवलंबून असून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत. ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी खऱ्या अर्थाने या स्थळाला त्याकाळी प्रकाश झोतात आणले होते.सुंदर नैसर्गिकरित्या शुद्ध वातावरण निर्मिती आणि स्वच्छ हवा त्यातच मोटार वाहनांची वर्दळ नसल्याने प्रदूषण मुक्त असल्याने देशविदेशातील पर्यटक इथे आवर्जून भेटी देत असतात त्यामुळे हे पर्यटनस्थळ जगप्रसिद्ध आहे.

त्याकाळी इथल्या एकूणच बावन्न किलोमीटर परिसरात निर्माण केलेल्या पॉईंट्स त्याचप्रमाणे रस्त्यांना अनेक मान्यवरांची नावे देण्यात आली आहेत तर स्वातंत्र्या नंतर देशसेवेसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या विभूतींची नावे सुध्दा विविध रस्त्यांना दिली गेली आहेत.नजीकच्या काळात एका शासकीय अधिकाऱ्यांचे नाव सुध्दा येथील एका रस्त्याला देण्यात आले आहे त्यांनी केवळ दोन वर्षे मुख्याधिकारी पद उत्तम प्रकारे सांभाळले होते आणि त्यांच्याच कार्यकाळात अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले गेले आणि त्याचा फायदा माथेरानच्या विकास कामासाठी मोठया प्रमाणात झाला होता.

परंतु आगामी काळात सुध्दा काही रस्त्यांचे अशाप्रकारे नामकरण करण्यात येणार असल्याचे समजते आहे ज्यांनी फक्त आपल्या एकाच समाजासाठी भरीव योगदान दिले आहे ज्यांनी या गावासाठी किंवा स्थानिक नागरिकांच्या भल्यासाठी काहीच कामे केली नाहीत अशा व्यक्तींचे नाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे योग्य नसून संबंधित व्यक्तींच्या माध्यमातून या संपूर्ण गावासाठी इथल्या शैक्षणिक उपक्रमात योगदान, त्याचप्रमाणे विकासासाठी आवश्यक ती मदत करणे गरजेचे होते इथल्या पर्यटन वाढीसाठी खारीचा वाटा नसताना केवळ एका विशिष्ट समाजासाठी मदत केली म्हणजे गावासाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे हे सपशेल चुकीचे असून अशाप्रकारे जर कुठल्याही रस्त्याचे नामकरण केले गेले तर ते अशोभनीय आहे असे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे त्यामुळे नगरपरिषदेने ठराव मंजूर करताना साधकबाधक विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे उगाच कुणाच्याही सांगण्यावरून अथवा काही आमिषापोटी ज्यांचे शून्य योगदान आहे अशांची नावे रस्त्याला देणे म्हणजे एकप्रकारे हास्यास्पद बाब आहे असेही जेष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.

Exit mobile version