कोरोनाचे नियम पाळून शिवराज्यभिषेक सोहळा होणार साजरा


। महाड । प्रतिनिधी ।
कोरोनाचा महामारीमुळे किल्ले रायगडावर होणार्‍या सोहळ्यावर निर्बध आले असुन या वर्षी गडावर तीथीप्रमाणे दि.22/23 जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348 वा शिवराज्यभिषेक सोहळा कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून शासनाने दिलेल्या निर्देशा प्रमाणे साजरा करण्यात येत असल्याची माहिती शिवराज्यभिषेक दिन सोहळ्याचे आयोजक आ. भरत गोगावले यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

किल्ले रागडावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या मराठी तीथीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासुन शिवराज्यभिषेक दिन भव्य स्वरुपात साजरा करण्यात येतो. गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने घालुन दिलेल्या नियमाप्रमाणे मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा गडावर साजरा करण्यात येत असल्याची माहिती आ.भरत गोगावले यांनी दिली. या वर्षीदेखील ऑनलाईन पद्धतीने शिवभक्तांना हा सोहळा पाहाता येणार आहे. किल्ले रायगडावर सालाबाद प्रमाणे पारंपारीक पध्दतीने विधीवत पुजन करुन सोहळा साजरा करण्यात येणार असुन या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह मधुन पाहाता येणार आहे.

Exit mobile version