। नवी मुंबई । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन उद्योग विभाग आणि कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमानाने आय सपोर्ट टू युअर बिजनेसच्या आयोजनातून कोषा कार्निवल बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला.
यावेळी लहान-लहान उद्योगांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, सहाय्य करण्याचे काम कोषा आणि आय सपोर्ट टू युअर बिसनेस टीमच्या माध्यमातून करण्यात आले. दि.18 आणि 19 जूनदरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळला. याप्रसंगी आय सपोर्ट यूर बिझनेसचे कौस्तुव घोष, लक्ष्मी सोरटे, रिंकी वनमोरे यांच्यासह कोषाची टीम आणि आय सपोर्ट युअर बिसनेसची संपूर्ण टीम उपस्थित होती.