शुभ वर्तमान- देशाची नारीशक्ती स्वातंत्र्यानंतर प्रथमच वाढतेय

पुरुषांच्या तुलनेत महिला लोकसंख्या अधिक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशाचा अमृतमहोत्सव साजरा होत असतानाच देशातील महिलांची संख्याही पुरुषांच्या संख्येपेक्षा वाढू लागल्याचे सर्वेक्षणातून आढळून आलेले आहे. यामुळे भविष्यात भारताची वाटचाल वुमन पॉवरकडे होत असल्याचे शुभवर्तमान केंद्राने दिलेले आहे.
देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढली असून, आता दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला असे प्रमाण झाले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी 2015-16 मध्ये आयोजित केलेल्या सर्वेक्षण 4 मध्ये ही संख्या दर 1,000 पुरुषांमागे 991 महिला होती.

स्त्री,पुरुष संख्येत चढउतार
1990 च्या काळात 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 927 होती. 2005-06 मध्ये तिसर्‍या सर्वेक्षणात ते प्रमाण 1000-1000 सोबत बरोबर होते. त्यानंतर 205-16 मध्ये चौथ्या सर्वेक्षणात या आकडेवारीत पुन्हा घट दिसून आली. 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 महिला होत्या. परंतु, पहिल्यांदाच आता महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक झालीय. एवढंच नाही, तर लिंग गुणोत्तरातही सुधारणा झालीय. 2015-16 मध्ये 1000 मुलांमागे 919 मुली होत्या, त्या आता 2019-21 मध्ये 1000 मुलांमागे 929 मुलींवर सुधारलं आहे.

सर्वेक्षण 5 डेटामध्ये खेड्यांमध्ये दर 1,000 पुरुषांमागे 1,037 महिला आहेत, तर शहरांमध्ये 985 महिला आहेत. छऋकड-4 मध्येही हीच बाब समोर आली आहे. त्या सर्वेक्षणानुसार खेड्यांमध्ये 1,000 पुरुषांमागे 1,009 महिला आणि शहरांमध्ये 956 महिला होत्या.
देशात 23 राज्ये अशी आहेत, की जिथं दर 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात दर हजार पुरुषांमागे 1017 महिला, बिहारमध्ये 1090, दिल्लीत 913, मध्य प्रदेशात 970, राजस्थानमध्ये 1009, छत्तीसगडमध्ये 1015, महाराष्ट्रात 966, पंजाबमध्ये 938, हरियाणामध्ये 926, झारखंडमध्ये 1050 महिला आहेत.
सर्व्हे-5 नुसार एका महिलेद्वारे आपल्या आयुष्यात मुलाला जन्म देण्याची एकूण संख्य 2.2 वरुन 2 झाली आहे, तर गर्भनिरोधक प्रसार दर 54% वरून 67% पर्यंत वाढला आहे. छऋकड-5 मध्ये 2019-20 या वर्षात झालेल्या सर्वेक्षणातील डेटा एकत्रित करण्यात आला. या दरम्यान जवळजवळ 61 लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.

Exit mobile version