300 वर्षांपूर्वीच्या गुहेमध्ये दांपत्याला दिसलं भूत; सर्व घटना कॅमेर्‍यामध्ये कैद

भूताच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. काही नुसत्या कथा असतात तर काही जण आपल्याला आलेला अनुभव ऐकवत असतात. पण खरंच असं भूत आपल्यासमोर येऊन उभं राहिलं तर? याचाच अनुभव इंग्लंडमधील एका दाम्पत्याने घेतला असून त्यांनी 300 वर्ष जुन्या गुहेमध्ये भूतं पाहिल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे या भूतांचा व्हिडीओही त्यांनी रेकॉर्ड केला आहे.इंग्लंडमध्ये कार्नेवॉल येथे एक पुरातन गुहा आहे. ही गुहा 300 वर्ष जुनी असून येथे पर्यटकांचा राबता असतो. याच गुहेमध्ये टोनी आणि बेथ फर्ग्यूसन हे दांपत्य एकट्याने फिरायला गेले होते. गुहेमध्ये गेल्यानंतर दोघांनी एकमेकांचे व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली.

या दरम्यान त्यांना आजूबाजूला विचित्र आकृत्या दिसून लागले आणि अचानक ‘गेट आऊट’ असा आवाज आला. मात्र हा आवाज कुठून आला हे त्यांना कळले नाही.हा आवाज ऐकल्यानंतर काही वेळाने त्यांनी गुहेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यानंतर त्यांनी गुहेतील व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांच्या पायाखालजी जमीन सरकली. व्हिडीओत त्यांना आपल्या आजूबाजूला चित्रविचित्र आकृत्या दिसल्या. याबाबत ‘द मिरर न्यूज’ने वृत्त दिले आहे.टोनी आणि बेथ यांना व्हिडीओमध्ये दोन विचित्र आणि भीतीदायक आकृत्या दिसल्या. तसेच पहिली आकृती एका मुलीची असून ती आपल्याला ‘हॅलो’ बोलतेय असा आवाजही त्यांनी ऐकला.

हा आवाजही व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाला आहे. तर दुसरी आकृती त्यांना ‘गेट आऊट’ म्हणत असून हे सर्व व्हिडीओत रेकॉर्ड झाले आहे.दोघेही ‘घोस्ट हंटर्स’दरम्यान, या ठिकाणी अन्य कोणी असते तर त्याची भीतीने गाळण उडाली असती. मात्र टोनी आणि बेथ हे दांपत्य भूतांचाच शोध घेत फिरत असताना आणि स्वत:ला ‘घोस्ट हंटर्स’ म्हणतात. दोघेही विविध ठिकाणी फिरत असतात, मात्र गुहेतील अनुभव विचित्र होता, असे टोनीने सांगितले. गुहेमध्ये भूतं असावीत याचा आम्ही विचारही केला नव्हता आणि गुहेबाबत असे कुठे वाचलेही नव्हते, असेही तो म्हणाला.

Exit mobile version