। रत्नागिरी । प्रतिनीधी ।
रत्नागिरी शहरातील मिरजोळे येथे शुक्रवारी (दि.26) दुचाकीचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नसून दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिरजोळे येथील एका सलुनच्या समोर दुचाकीचालकाने आपली दुचाकी (एमएच-08-एवाय 4698) उभी करून त्याच्या बाजूला उभा राहीला होतो. यावेळी अचानक जिमकॉम कंपनीकडून येणार्या हायड्रालिक क्रेनने दुचाकीला धडक देऊन अपघात केला. या हायड्रालिक संशयीत चालकाचे नाव निलेश कुमार शिवनाथ असल्यची माहिती पोलीसांकडून मिळत आहे. याप्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.






