राज्यपालांबाबत केंद्राने निर्णय घ्यावा – शरद पवार

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यपाल ही एक संस्थात्मक पद असलं तर विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केले असून, तसेच आता यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी काय तो निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांसंदर्भात मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये पवार यांनी कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर कोश्यारी हे दिल्लीतील उच्चपदस्थांची भेट घेण्यासाठी दिल्ली दौर्‍यावर आहेत. असं असतानाच शरद पवार यांनी राज्यपालांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली.

राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधन अशतात. मात्र छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्यात. त्या प्रकरणानंतर त्यांचं छत्रपतींबद्दल (चांगलं) बोलल्याचं स्टेटमेंट आलं. मात्र सगळ्या प्रतिक्रियांनंतर केलेलं हे विधान म्हणजे उशीराचं शहाणपण आहे, असं पवार म्हणाले. तसेच राज्यपालांचा विषय आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी बघावा असं सूचक विधान पवारांनी केलं. याचा निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घ्यावा. अशा व्यक्तीला राज्यपाल पदासारख्या जबाबदार्‍या देऊ नये, असं पवार म्हणाले.

बेळगाव, कारवार, निपाणी द्या
बेळगाव कारवार निपाणी आम्हाला देणार असाल तर जतच्या गावांची चर्चा करु, अशा शब्दात पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उत्तर दिलं. सीमावादावर भाजपला भूमिका टाळता येणार नाही. भाजपने यावर तत्काळ भूमिका जाहीर करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर महाराष्ट्रात समाविष्य करण्यासाठी गेली अनेक वर्ष लढा सुरु आहे. या लढ्यात महाराष्ट्राचं सातत्य राहिलं आहे. मी काल बोम्मईंचं जतबाबत विधान ऐकलं. जर तिकडचं सरकार बेळगाव कारवार निपाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असतील तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करणं शक्य होईल, असं म्हणत सीमावादावर पवार यांनी भाष्य केलं.

Exit mobile version