| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने अलिबाग, मुरुड, रोहा, नागोठणे परिसराला झोडपून काढले. त्यामुळे धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 17 धरण 100 टक्के भरली असून, रायगड जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे उन्नई धरण क्षमतेपेक्षा अधिक भरले आहे. धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कुंडलिका नदी पातळीत मोठी वाढ झाली असून, पाणी नदीपात्राच्या इशारा पातळीपर्यंत पोहोचले आहे.सध्या नदीची पाणीपातळी 23.10 मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कुंडलिका नदीवरील जुना पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.







