खारघर रेल्वे स्टेशन परिसरात मृतदेह
| पनवेल | वार्ताहर |
खारघर रेल्वे स्टेशन परिसरात फुटपाथ वर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खारघर पोलीस करीत आहेत. सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्ष, रंग गहूवर्णीय, उंची 5 फूट 4 इंच, चेहरा गोल, केस वाढलेले असून अंगात फिक्कट रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट तसेच पायात काळ्या रंगाची सॅन्डल घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने खारघर पोलीस ठाणे किंवा सपोनि निशांत धनवडे यांच्याशी संपर्क साधावा.
महिलेचा आढळला मृतदेह
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. अनोळखी महिलेचे अंदाजे वय 55 ते 60 वर्ष इतके आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 022- 27452333 किंवा सपोनि श्रीकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधावा.