। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील गागोदे खिंडीतील जंगलामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. याच जंगलभागामध्ये शिना बोरा हत्याकांड घडले होते. आता सापडलेल्या मृतदेहामुळे पुन्हा एकदा गागोदे खिंड चर्चेत आली आहे. धोंडीराम जनार्दन लेंडे (34) असे मृताचे नाव आहे. गणपत लेंडे यांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. धोंडीराम यांचा मृतदेह दगडामध्ये अडकल्याचे आढळले. ते मोलमजुरी करणारे असल्याने धोंडीराम या जंगलात कोणत्या कारणासाठी आले. याबाबतचे गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदरच्या घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.