| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील डोंबाळा कॉलेज रोड जाणार्या रस्ता रेल्वे फाटकाच्या मागे किष्णा सॉलीटियर्स बिल्डीगच्या कंपाउडच्या बाजुला, करंजाडे येथे एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. एक बेवारस पुरूष वय अंदाजे 60 ते 65 वर्ष याचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.