जिल्हा घटना; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील बेलोशी मधील राधिका रूपेश काटले या महिलेला १४ मे रोजी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालययात दाखल करण्यात आले होते. तिची प्रसूति व्यवस्थित झाली होती मात्र त्यावेळी नियुक्त करण्यात आलेले डाॅ.प्रियल शेंडे जागेवर हजर नसल्याने सदर प्रसूति उपस्थित असलेल्या परिचारिका करावी लागली त्यामुळे झालेल्या चुकीने नवजात बालकाचा मृत्यू झाला.
त्या महिलेवर सायंकाळी ६ पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत काहीच उपचार झाले नाही. याबाबत नातेवाईक डाॅक्टरांना विचारण केली असता डाॅक्टरांनी उडवाउडवीची उत्तर दिली. तसेच नातेवाईकांनी डाॅक्टरांना ३००० रूपये घेण्याबाबत विचारणा केली असता डाॅक्टरांनी पैसे घेत असल्याचे पोलिसांसमोर मान्य केले.
याबाबत नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुहास माने यांचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही व उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गवई यांना फोन केला असता त्यांनी तो उचलला नाही. तर, जबाबदार डाॅ.फुटाणे यांनी माहीती दिली परंतु त्यातही उडवाउडवीची उत्तर दिली.
या घटनेमुळे जिल्हा रूग्णलयाचा बेजबाबदारपणा चवाट्यावर आला आहे.
याबाबत रूग्णाचे पती तसेच बेलोशी ग्रामस्थ व नातेवाईक यांनी जबाबदार डाॅक्टारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.