। मुरुड जंजिरा। वार्ताहर ।
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री, डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुरुडमध्ये श्रीसदस्यांच्यावतीने रविवारी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
शहरातील सर्व रस्ते 630 श्रीसदस्यांनी स्वछता मोहीम राबून चकाचक केले .शहरातून गोळा झालेला 34 टॅन कचरा पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला .यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, जैन समाज अध्यक्ष हसमुख जैन, नायब तहसिलदार गोविंदा कौटुंबे, माजी नगरसेवक बाबा दांडेकर, वनविभागाचे के.आर.खांदेकर उपस्थित होते. या उपक्रमात मुरुड नगर पालिकेचे सर्व कर्मचारी सामील झाले.
बैठकांच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचे आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक आयाम देण्याचे अनन्यसाधारण काम पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. त्यांचा स्वछता मोहिमेत मला श्रीसेवा करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य समजतो .
पंकज भुसे