तोतया सैनिकाकडून दिशा लॅबची फसवणूक

15 सैनिकांच्या रक्तचाचणीच्या बहाण्याने घातला गंडा
। अलिबाग । वार्ताहर ।
शहरातील दिशा पॅथॉलॉजी लॅबमध्ये तोतया सैनिकाने संपर्क साधत 15 सैनिकांची रक्तचाचणी करायची असल्याचा बहाणा करीत तेथील कर्मचार्‍याकडून गुगल पे वर आगाऊ रक्कम पाठवत असल्याचे सांगत त्यांच्याच मोबाईलवरुन 59 हजार 800 रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे.
अलिबाग मधील दिशा पॅथॉलाजी लॅब येथे काम करणार्‍या महिला फिर्यादी रा.शितोळे आळी, भास्कर सोसायटी, फलॅट क्र.02, अलिबाग यांना लॅबमध्ये 15 आर्मी जवानांची रक्तचाचणी करायची असल्याचे खोटे सांगून फिर्यादींच्या गुगल पे अकाउंटला रक्तचाचणीची अ‍ॅडव्हान्स रक्कम पाठवायच्या बहाण्याने त्यांचा मोबाईल घेऊन उलट फिर्यादींच्याच गुगल पे अकाउंटवरुन 59 हजार 800 रुपये रक्कम आरोपीने स्वतःच्या खात्यावर जमा करुन फिर्यादीची फसवणूक केली.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोनि/श्री.सणस हे करीत आहेत.

Exit mobile version