| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यावर पण दादा तुम्ही सध्या सरकारमध्ये आहात. तुम्ही जर दिल्लीत जाऊन शेतकर्यांचे प्रश्न मांडले असते, तर तुम्हाला मानलं असतं असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. तुम्ही म्हणता सरकारचा निर्णय चुकला, पण दादा तुम्ही भाजपसोबत गेला तोच तुमचा निर्णय चुकल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, योजनांची व्याप्ती आपण वाढवणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहीत दादा पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याच आयोजन केलं आहे. यावेळी रोहित पवार बोलत होते.
शेतकर्यांनी आता बीज बिल भरायचे नाही. मागचे थकलेले बिलही द्यायचे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. कांदा निर्यात आता बंद करायची नाही. लोकसभेमध्ये जो झटका दिला, तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, असे त्यांनी म्हटले.