वर्षभरापासून संरक्षण कठडे गायब

जंगली पीर नदीकाठी अपघाताचा धोका; एम.एस.आर.डी.सी प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी

| पाली-बेणसे | प्रतिनिधी |

सरकारी काम आणि बारा महिने थांब या म्हणीचा प्रत्येय पाली-खोपोली मार्गावरील जंगली पीर अंबा नदीकाठावरील वर्षभरापासून तुटलेल्या संरक्षण कठडे पाहिल्यावर येतो. संरक्षण कठड्याअभावी वेगवान वाहने नदीत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती असताना एम.एस.आर.डी.सी प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून अपघाताच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते. पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या वाहतूक सुरक्षेसह प्रशासनाने येथील तुटलेले कठडे तातडीने बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा चंद्रकांत चव्हाण यांनी दिला आहे.

अनेक ठिकाणी धोकादायक वळणे व अपघाती क्षेत्र असूनही कोणतेही सूचना फलक याठिकाणी नाहीत, संरक्षण कठड्याच्या गंभीर समस्येकडे सातत्याने वृत्तपत्रातून आवाज उठवूनही प्रशासनाला जाग येत नसल्याचे पाहून प्रवासी जनतेतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने जंगली पिरनजीक नदीकाठी संरक्षण कठडे असणे अत्यंत गरजेचे आहे. ते कठडे एम.एस.आर.डी.सी प्रशासनाने तात्काळ बसवावेत अन्यथा भविष्यात होणर्‍या जीवघेण्या अपघातास प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा लता कळंबे यांनी दिला आहे.

जंगली पीर नदीकाठचे संरक्षण कठडे मागील वर्षभरापासून तुटले असून, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याठिकाणी तातडीने कठडे बसविण्यात यावेत. अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडू.

चंद्रकांत चव्हाण, सामाजिक कार्यकर्त
Exit mobile version