रुग्णालयातील पोलीस कक्ष उघड्यावर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून पोलीस कक्ष आहे. या पोलीस कक्षाची अवस्था दयनीय असल्याचे समोर आले आहे. पोलीस कक्षाला स्वतंत्र कार्यालय नाही. त्यामुळे या कक्षातील काही वस्तू लंपास होण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे या कक्षाला स्वतंत्र कार्यालयाची प्रतिक्षा लागून राहीली आहे.

अलिबाग हे जिल्हयाचे ठिकाण आहे. जिल्ह्यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या रुग्णालयात 500 हून अधिक रुग्ण रोज उपचारासाठी येतात. त्यात 250 रुग्णांवर नियमीत उपचार होत आहेत. रुग्णांच्या सुरक्षेसह, रुग्णालयाच्या आवारात कोणताही गैरप्रकार घडू नये. कायदा व सुव्यस्था बिघडू नये तसेच आकस्मात मृत्यू, जखमींची नोंद घेण्यासाठी पोलीस कक्ष उभारण्यात आले आहे. सुरुवातीला पोलीस कक्षाला स्वतंत्र कार्यालय होते. परंतू ती जागा जिल्हा सामान्य रुग्णालयाने ऐन कामासाठी वापरल्याने पोलीस कक्ष रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर उघडण्यावर उभारण्यात आले. या रुग्णालयाच्या आवारात असलेल्या पोलीस कक्षाला स्वतंत्र कार्यालय नसल्याने पोलीसाच्या खुर्चीमध्ये कोणीही जाऊन बसत आहे. त्यामुळे उघडयावर असलेल्या पोलीस कक्षाला स्वतंत्र कार्यालय असावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Exit mobile version