म्हसळ्याचा विकास हाच ध्यास- तटकरे

नगरपंचायत हद्दीत विकासकामे

| म्हसळा | वार्ताहर |

म्हसळा शहराचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन खा.सुनिल तटकरे यांनी केले. शहरातील नगरपंचायत हद्दीतील विविध विकासाकामांचे उद्घाटन खा.तटकरे यांनी केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. म्हसळा शहरातील विविध कामांचे आराखड्यातील रस्ते विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 1 कोटी रुपये खर्चाचे 6 कामांचे भूमिपूजन तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष असहल कादीरी, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, गट नेते संजय कर्णिक, शाहीद उकये, काँग्रेस पक्ष प्रमुख फझल हळदे, लाम हळदे, रफिक घरटकर, शकुर हूर्जूक, नगरसेवक नासीर मिठागरे, अनिकेत पानसरे, कर्णिक, करण गायकवाड, नगरसेविका सरोज म्हशिलकर, नौसिन चोगले, सभापती सूमैया आमदनी, वृषाली घोसाळकर, नईम दळवी, वसीम कोदरे, अबु उकये, बाबा हर्जुक, सलीम चोगले आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version