ग्रामपंचायतीवर कारभारीच नसल्याने गावचा विकास खुंटला

26 ग्रामपंचायतीवर प्रशासक

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव तालुक्यात 75 ग्रामपंचायती असून त्यापैकी तब्बल 26 ग्रामपंचायतीच्या माहे जून, जुलै 2023 मध्ये मुदती संपल्या आहेत. त्यामुळे माणगाव तालुक्यातील या ग्रामपंचायतीचा गावगाडा कोसळला असून गावचा विकास पर्यायाने खुंटत चालला आहे. ग्रामपंचायतीवर कारभारीच नसल्याने गावाच्या विविध विकासासाठी निधी कोण आणणार? असा सवाल ग्रामस्थांतून बोलले जात आहे. या ग्रामपंचायतीवर शासनाने प्रशासक बसवले असले तरी, गावाच्या विविध विकासासाठी मंत्री, आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडील गावाच्या विकासासाठी देण्यात येणारा निधीला आळा बसत आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनांनी प्रशासक म्हणून माणगाव पंचायत समितीमधील संबंधित विविध अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या असून या ग्रामपंचायतीचा गावगाडा या प्रशासकामार्फत चालविला जात आहे. मात्र या प्रशासकांना लोकप्रतिनिधीकडील निधी आणण्यात मर्यादा पडतात. त्यामुळे गावच्या विकासाला गावगाड्याला खिळ बसत आहे.

मोर्बा ग्रामपंचायतीत महेंद्र गायकवाड, विस्तार अधिकारी पंचायत, पुरार येथे एस.एम. तांबट, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण, जिते बी.व्ही. काप, कृषि अधिकारी, काकल, एस.आर. काकडे आरोग्य पर्यवेक्षक, नागांव, ए.डी. मारकड विस्तार अधिकारी कृषि, शिरसाड, महेंद्र गायकवाड विस्तार अधिकारी पंचायत, विहुले, एस.आर. काकडे आरोग्य पर्यवेक्षक, मांजरवणे, आर.एस. आंबरे, विस्तार अधिकारी आरोग्य, चांदोरे, ए.डी. मारकड विस्तार अधिकारी कृषि, गोवेले, ए.डी. मारकड विस्तार अधिकारी कृषि वारक, मनिषा बी. मुसळे विस्तार अधिकारी सांख्यिकी, वडवली, ए.डी. मारकड विस्तार अधिकारी कृषि, कडापे, बी.व्ही. काप कृषी अधिकारी, वणीमलई कोंड, एस.एम. तांबट, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण, उणेगाव, बी. व्ही. काप कृषी अधिकारी, पळसगाव बुद्रुक, महेंद्र गायकवाड विस्तार अधिकारी पंचायत, रातवड मनिषा बी. मुसळे विस्तार अधिकारी सांख्यिकी, कवीळवहाळ बुद्रुक, मनिषा बी. मुसळे विस्तार अधिकारी सांख्यिकी, वडगाव, मनिषा बी. मुसळे विस्तार अधिकारी सांख्यिकी, भुवन, आर.एस. आंबरे विस्तार अधिकारी आरोग्य, खरवली, आर. एस. आंबरे विस्तार अधिकारी आरोग्य, अंबर्ले, एस.एम. तांबट वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण, भाले, बी.व्ही. काप कृषी अधिकारी, गांगवली, महेंद्र गायकवाड विस्तार अधिकारी पंचायत, लोणशी, बी. व्ही. काप कृषी अधिकारी, दहिवली तर्फे गोवेले, रत्नदीप आंबरे या 26 ग्रामपंचायतीवर हे प्रशासक बसवले आहेत.

या ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्याने या ग्रामपंचायतीचे प्रशासकामार्फत काम चालवले जात आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाला चालना देणारे गावचे सरपंच व सदस्य नसल्याने गाव विकासाचा प्रश्न उभा राहत आहे. या ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गावचा विकास गतिमान होण्यासाठी सरपंच व सदस्यांची नितांत गरज आहे.


कोट
गावातील नागरिकांना भेडसावणाने प्रश्न सरपंचाना माहित असतात. त्यामुळे तो गावचे प्रश्न शासन व लोकप्रतिनिधीकडे मांडतो. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे असते. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणूका निवडणुक आयोगाने घ्याव्यात.

Exit mobile version