कळंबोली सर्कलची कोंडी फुटणार

। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली येथील वर्तुळाकार मार्गावर 13 विविध रस्ते जोडले आहेत. याच वर्तुळाकार मार्गिकांवरून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून नियमित वाहतूककोंडी होत असून हा प्रेन गंभीर झाला आहे. भाजपच्या हा स्थानिक आमदारांनी हा प्रश्‍न थेट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्यासमोर बैठकीत मांडला. यानंतर गडकरी यांनी यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे येथील कोंडी फुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल, उरणला जोडणारा कळंबोली सर्कल हा महत्त्वाचे वाहतुकीचे बेट ठरत आहे. पनवेल व उरण येथे आलेले आणि भविष्यात येणारे मोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे येथील दळणवळण व्यवस्था सुरळीत असणे गरजेचे आहे. मात्र कळंबोली सर्कल येथे 13 विविध रस्ते एकाच सर्कला जोडले असल्याने येथे नेहमीच कोंडी पाहायला मिळते. मुंब्रा, भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरांत जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर वाहतुकीमुळे या मार्गिकेवर ताण वाढला आहे. तसेच मुंबईहून पुणे व गोवा येथे जाणार्‍या वाहनांमुळे वर्दळ मोठया प्रमाणात आहे. येथे सिग्नल यंत्रणा बसविल्यानंतरही येथील कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने या बैठकीत विचारविनिमय करण्यात आले. सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू असून विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील ङ्गएअर ट्रॅफिकफ कमी होईल, मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्‍वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे आवश्यक असल्याचे बैठकीत मांडण्यात आले.

Exit mobile version