विरोधकांचा असंतुष्ट आत्मा म्हणजे विकृतीची प्रवृत्ती – खा. तटकरे

| म्हसळा | वार्ताहर |
आघाडी सरकारच्या माध्यमातून नेवरूळ गावात 90 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात आली आहेत, याचे मनस्वी समाधान आहे. परंतु नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन करण्याचे कार्यक्रमाला येत असताना मला सांगण्यात आले कार्यक्रम घेऊ नका. असे सांगणार्‍या लोकांचा आत्मा हा असंतुष्ट असून, त्यांची प्रवृत्ती ही विकृतीची आहे, असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी विरोधकांना लगावला.

गावात पाण्याची टाकी बांधण्यासाठी जी जागा देण्यात येणार आहे त्याकामी कोणीही अडवणूक करू नये अशी विनंती करताना पितृपक्षात एखादे शुभ काम करणे म्हणजे सामजिक शुभसंकेत आहेत असे मी मानतो असेही खासदार तटकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांच्यासमवेत अलिशेठ कौचाली, महादेव पाटील, समीर बनकर, बबन मनवे, सोनल घोले, सतिश शिगवण आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version