पूरग्रस्तांची दिवाळी झाली गोड

। चिपळूण । वार्ताहर ।
तालुक्यतील पूरग्रस्तांची दिवाळी अत्योंदय प्रतिष्ठानमुळे गोड झाली आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निता लाड आणि आ. प्रसाद लाड यांच्यातर्फे चिपळूणमधील पूरग्रस्त भागात दिवाळी फराळ तथा जीवनाश्यक सामानाचे वाटप करण्यात आले आहे.
दिवाळी सणानिमित्त राज्यात सर्वत्रच आनंदाचे वातावरण असले, तरी सर्वांचीच दिवाळी ही आनंदमयी असलेच, असे नाही. गेल्या दोन वर्षात आलेल्या विविध संकटामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटांना तोंड देताना नाकी नऊ आले आहेत. तेव्हा आपल्याकडील आनंद अशा लोकांमध्ये वितरित करण्याच्या दृष्टीकोनातून या उपक्रमाचे आयोजन देवकी फाऊंडेशन, मुंबईचे अध्यक्ष यतीन आयरे यांच्या वतीने उपाध्यक्ष आशिष साळसकर तथा आ. प्रसाद लाड यांचे स्वीय सहाय्यक सचिन राणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
या अंतर्गत, चिपळूण तालुक्यामधील पूरग्रस्त आणि सह्याद्री खोर्‍यातील लोकवस्तील गरजू महिला व पुरुष यांना कपडे व लहान मुलांसाठी खाऊचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले.
यामध्ये कोळकेवाडी आदिवासी वाड्यामध्ये महिलाना साड्या , कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कोळकेवाडी प्रयोग भूमी श्रमिक सहयोग मुक्त शिक्षण केंद्र सह्याद्रीच्या पायथ्या खाली,आदिवासी वस्ती शाळा मुलांना दिवाळीचा फराळ वाटण्यात आला. याप्रसंगी, देवकी फाऊंडेशनचे अध्यक्ष यतीन आयरे, विनोद सुर्वे, शिक्षक वर्ग मोहिते मॅडम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version