| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ पोलीस स्टेशन अंतर्गत कळंब पोलीस चौकीत दिवाळी सणानिमित्त परिसरातील आदिवासी गरीब महिलांना पोलीस कर्मचारी तसेच अंकित परमार यांच्या वतीने साड्या आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी राजेंद्र तेंडुलकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकित परमार यांनी कळंब परीसरातील आदिवासी महिलांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने कळंब कातकरवाडी, मिरचुलवाडी येथील सुमारे 150 गरीब गरजू महिलांना साड्या तसेच फराळाचे वाटप केले. यावेळी सह्ययक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक खोत,आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.