| खांब-रोहा । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील प्रा.शाळा तळवलीतर्फे शाळेत दीपावली सणाचे औचित्य साधून किल्ले स्पर्धा आयोजीत करण्यात आली. आपल्या देशाचा, राज्याचा तसेच जिल्ह्याचा इतिहास समजावा, तसेच गड-किल्ल्यांची माहिती व्हावी या उद्देशाने या शाळेत गेली अनेक वर्षे ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्याच अनुषंगाने या वर्षी ही आयोजित केलेल्या स्पर्धेत चिमुकल्या ज्ञातांनी जवळपास वीस किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या. या स्पर्धेत अंश सावंत, काव्या चव्हाण, श्रावणी चव्हाण विजेते ठरले, यांना सुधीर पाटील, रोशन चव्हाण, जितीन सावंत, अन्य ग्रामस्थ यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार येथील शिक्षक सचिन खेंगरे यांनी केले.