| गोवे-कोलाड | वार्ताहर |
आंबेवाडी नाक्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांना चावा घेतला असून, आंबेवाडी नाक्यावर दशहत निर्माण झाली आहे. संबंधितांकडून याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आंबेवाडी नाका हे मुंबई-गोवा महामार्गावरील बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असून, येथे असंख्य नागरिक ये-जा करीत असतात तसेच या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे असंख्य शालेय विद्यार्थी ये-जा करीत असतात. पिसाळलेल्या कुत्र्याने एका महिलेवर हल्ला करून तिला रक्तबंबाळ केले. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.