महानमधील डोंगरकोळी समाज शेकापमध्ये

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते जल्लोषात स्वागत

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून रामराज परिसरातील महान येथील डोंगरकोळी समाजातील असंख्य तरुण मंडळी, ग्रामस्थ व महिलांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. महाविकास आघाडी पुरस्कृत, शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, विक्रांत वार्डे, रामराज परिसरातील शेकापचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षच विकास करू शकतो. गावांचा विकास हा शेकापच्या माध्यमातून होऊ शकतो, हा विश्‍वास ठेवत महान येथील डोंगरकोळी समाजातील दोनशेहून अधिक कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षात सामील झाले आहेत. प्रवेशकर्त्यांमध्ये महिलांचीही मोठा सहभाग होता. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांना मताधिक्क्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत या निवडणुकीत चित्रलेखा पाटील यांना बहुमतांनी निवडून देण्याचा निर्धार उपस्थितांनी केला. दरम्यान, चित्रलेखा पाटील यांचे महान येथे आगमन होताच त्यांचे पुप्षगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Exit mobile version