आदिवासी भवनाचे स्वप्न होणार साकार

| तळा । वार्ताहर ।
आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, ही गेली अनेक वर्षे आदिवासी समाजाची मागणी होती. आदिवासी समाजातील लोककला, सामूहिक लग्न, परंपरागत सण, उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने आदिवासी भागामध्ये जागा उपलब्ध नसते.जागेचा प्रश्‍न प्रलंबित होता राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. उत्तम जाधव आणि कैलास पायगुडे यांनी आदिवासी समाजासाठी तळा शहरात जागा उपलब्ध करून दिली. दि.6 मे रोजी खा.तटकरे यांनी जागेची पाहणी केली आणि तळा शहरात आदिवासी सांस्कृतिक भवन होणार यावर शिक्कामोर्तब झाले.
तळा शहरात आदिवासी भवन बांधण्यात येणार असल्यामुळे या समाजात असलेले कौशल्य व इतर गुणांना वाव मिळणार आहे. आणि त्यांच्यात असलेले कौशल्य आणि सांस्कृतिक बुजरेपणा घालविणे यासाठी सांस्कृतिक भवनाचा उपयोग होणार आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, आदिवासी लोककलेला व्यापक स्वरूप मिळावे, आदिवासींना त्यांनाहक्काची जागा प्राप्त व्हावी याकरिताआदिवासी उपाययोजनेतून आदिवासी सांस्कृतिकभवन साकारले जाणार असून आदिवासी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी नाना भौड, परशुराम पवार, नथुराम मुकण उपस्थित होते.

Exit mobile version