। तळा । वार्ताहर ।
तळा तालुका आदिवासी भवनाच्या उभारणीसाठी खा. सुनील तटकरे यांच्या फंडातून 15 लाख रुपये, तर आ. अदिती तटकरे यांच्याकडून दहा लाख असा एकूण 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पत्र देण्यात आले आहे. तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव यांच्या हस्ते सदरचे पत्र देण्यात आले. यावेळी उपसभापती चंद्रकांत राऊत, कैलास पायगुडे, किशोर शिंदे, नागेश लोखंडे, प्रवीण आबर्ले, दिपक पवार, आदिवासी कोअर कमिटी व समाज बांधव उपस्थित होते.आदिवासी भवनसाठी लागणारी जागा जमीन उत्तम जाधव, कैलास पायगुडे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. दरम्यान, तळा तालुका आदिवासी कोअर समितीचे अध्यक्ष गोविंद पवार, उपाध्यक्ष चंदर पवार, सचिव राजू जाधव, खजिनदार एकनाथ कोळी, माजी अध्यक्ष नथुराम मुकणे, सल्लागार परशुराम पवार यांनी खा. सुनील तटकरे, आ. अदिती तटकरे यांचे आभार मानले आहेत.