चाकूच्या धाकाने चालकाला लुटले

। पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात त्रिकुटाने ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्याच्या मोबाईलमधून 92 हजारांची रक्कम गुगल पेद्वारे स्वतःच्या खात्यात वळती करून घेतली. तसेच त्यानंतर पलायन केल्याची घटना नुकतीच कळंबोली येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. त्रिभुवन यादव (45, रा. कळंबोली, सेक्टर-20) असे लुटमार झालेल्या चालकाचे नाव आहे.

Exit mobile version