गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांचे मत
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
शिक्षण विभागाच्या मांडला केंद्राची शिक्षण परिषद महाळुंगे शाळेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी बोलताना मुरुड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी शिक्षण प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असून, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. तसेच, युडायस प्लस, महाडीबीटी नोंदणी, आधार अपडेशन, शालेय दप्तर, परसबाग, पोषण आहार, परिसर स्वच्छता अशा अनेक बाबींचे मार्गदर्शन केले. शिक्षणपरिषदेच्या माध्यमातून परस्परांच्या भेटी, विचारविनिमय यातून शिक्षणप्रक्रियेत नवचैतन्य निर्माण होत असल्याचे मत गवळी यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये कार्यक्रम अध्यक्ष मनिषा नागे, रमाकांत ठाकूर, देवेंद्र तांडेल, छाया गवळी, सचिन माकर, रवींद्र पालकर, संजना कोटकर, मिलिंद पालवणकर, मतीन सुभेदार, अनिषा चोगले, अस्मिता भगत आणि इतर शिक्षक तर महेश भगत, संतोष पुकळे, चेतन पाटील, अंजली पुकळे आदि साधनव्यक्ती उपस्थित होते.