काळानुरूप बदललेला शैक्षणिक ढाचा स्वीकारलाच पाहिजे : खा. तटकरे

| कोर्लई | वार्ताहर |
इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा असल्याने जगभरात या भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज आपला पाल्य इंग्रजी शाळेत शिकून मोठा माणूस बनावा, असे अनेक पालकांचे स्वप्न बनले आहे. याचा अर्थ, आपण मातृभाषेपासून दूर जात असे नाही. मात्र, काळानुरूप बदललेला हा बदल किंवा शैक्षणिक ढाचा आपण स्वीकारलाच पाहिजे, असे प्रतिपादन खा. सुनील तटकरे यांनी मुरूड येथील कार्यक्रमात बोलताना केले.

मुरूड दस्तुरी नाका तेलवडे गावच्या हद्दीत नचिकेताज हायस्कूल इंग्रजी माध्यम शाळेच्या सुसज्ज नवीन इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम शनिवारी खासदार तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रमुख आणि उद्घाटक म्हणून बोलत होते. मुरूडचे माजी नगराध्यक्ष तथा मुरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मंगेश दांडेकर आणि मुग्धा दांडेकर या दाम्पत्याने पुढाकार घेऊन येथील ज्येष्ठ राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते करीमभाई मोदी यांच्या जागेत नचिकेताज हायस्कूल सुरू केले. सुमारे 400 विद्यार्थी यात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. खा.तटकरे पुढे म्हणाले इंग्रजी माध्यमाची शाळा काढणे आणि चालविणे हे आव्हानात्मक असून, हे शिवधनुष्य मंगेश दांडेकर आणि शाळेच्या संचालिक मुग्धा दांडेकर यांनी कोरोना काळातही यशस्वीपणे पेलून मुरूड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील इंग्रजी शिक्षणाची मोठी गैरसोय दूर केल्याची कौतुकास्पद भावना खा. तटकरे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी मंगेश दांडेकर, मुग्धा दांडेकर, प्रमोद देशमुख, मुरूड तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक, अतिक खतीब, तेलवडे सरपंच कल्पना वाघमारे,प्रा.विश्‍वास चव्हाण, उपसरपंच निलेश तांबडकर, स्मिताताई खेडेकर, स्नेहा पालकर, सुबोध महाडिक, अविनाश दांडेकर,विजय पैर, विजय भोय,अजित गुरव,विजय सुर्वे, चे मुख्यध्यापक योगेश तंटक, नितीन पवार,प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, प्रमिला माळी, मृणाल खोत, ललित शेठ जैन, नितीन आंबूर्ले, मुरूड सुपारी संघाचे चेअरमन अविनाश बाबा दांडेकर, माजी मुख्याध्यापक शकील कडू, मुख्यध्यापक मेहबूब नगरबावडी,संजय गुंजाळ आणि मोठया संख्यने पालक आणि विध्यार्थी उपस्थित होते.न रेश बुवा भेर्ले, सागर राऊत आणि विध्यार्थ्यानी स्वागत गीत गाऊन सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टाफने परिश्रम घेतले. मुख्याध्यापक योगेश तंटक यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version