| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. येत्या मंगळवारी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या निवडणुकीत प्रथमच हात उंचावून मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे निवडीत पूर्णतः पारदर्शकता राहणार असून, संपूर्ण शहराचे लक्ष याकडे लागले आहे.
निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पालिका सदस्यांना शुक्रवारी, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी आपले नामनिर्देशन पत्र सादर करावे लागेल. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत महापालिका सचिवांच्या दालनात स्वतः उपस्थित राहून विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. मंगळवारी, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता निवडीसाठी विशेष सभा सुरू होईल. या प्रक्रियेचे मुख्य टप्पे हे सभेच्या सुरुवातीला अर्जाची कायदेशीर छाननी केली जाईल. पात्र
उमेदवारांची नावे घोषित केल्यानंतर 15 मिनिटांचा वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिला जाईल, अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. पीठासीन अधिकारी उमेदवारांची नावे वर्णानुक्रमाने पुकारतील. यावेळी प्रत्येक उमेदवारासाठी हात उंचावून मतांची नोंद घेतली जाईल. ज्यांनी उमेदवाराच्या बाजूने मत दिले, ज्यांनी विरोधात मत दिले किंवा जे सदस्य तटस्थ राहिले, अशा सर्वांची नोंद कार्यवृत्तात केली जाईल. त्यानंतर पीठासीन अधिकारी तात्काळ निकाल घोषित करतील. महापौरपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्याच पद्धतीने उपमहापौर पदाची निवडणूक पार पडेल.
10 फेब्रुवारीला होणार महापौर, उपमहापौरांची निवड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606