निवडणूक यंत्रणा सज्ज

29,957 मतदार हक्क बजावणार; मतदानासाठी 33 मतदान केंद्र तयार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29,957 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, थेट नागरध्यक्षपदासाठी दोन, तर सदस्य पदाच्या 21 जागांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, मतदानासाठी दहा प्रभागांकरिता 33 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा जोरदार तयारी करीत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी स्थानिक पातळीवर शाळा महाविद्यालये यांच्याकडून जनजागृती करणारी पथनाट्ये तसेच रॅली काढून आवाहन करण्यात येत आहे.दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कर्जत येथे येऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय तसेच स्ट्राँग रूम आणि अन्य तयारीचा आढावा घेतला आहे. शहरात 29957 मतदार असून, हे मतदार ठरत जनतेतून निवडून द्यायचे अध्यक्ष निवडून देणार आहे. त्याचवेळी दहा प्रभागातून 21 सदस्य निवडले जाणार असून, प्रभाग एक ते नऊमध्ये प्रत्येकी दोन आणि प्रभाग दहामध्ये तीन सदस्य नगरपरिषदेवर निवडून जाणार आहेत. त्यासाठी 33 ठिकाणी मतदान केंद्रे बनविण्यात आली असून, प्रभा आठमध्ये चार तर प्रभाग दहामध्ये पाच तर अन्य प्रभागणामध्ये प्रत्येकी तीन मतदान केंद्रे बनविण्यात येत आहेत.

कर्जत नगरपरिषदेच्या प्रभाग एकमध्ये 2646 मतदार असून, तेथे तीन मतदान केंद्र आहेत. तर प्रभाग दोनमध्ये 2657 मतदार असून, प्रभाग तीनमध्ये 2294 मतदार असून, प्रभाग चारमध्ये 3010 मतदार आहेत.प्रभाग पाच मध्ये 2403 तर प्रभाग सहा मध्ये 3094 तसेच प्रभाग सात मध्ये 3197 मतदार आहेत. प्रभाग आठमध्ये 3350 तर प्रभाग नऊ मध्ये 2853 आणि प्रभाग दहा मध्ये 4453 एवढे मतदार आहेत.

प्रभाग एक मधील तीनपैकी दोन मतदान केंद्र हि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात असतील तर तिसरे मतदान केंद्र हे मुद्रे नाना मास्तर नगरमधील व्यवयामशाळेत असेल. प्रभाग दोनमधील दोन मतदान केंद्र ही दहिवली येथील डोंबे हायस्कुलमध्ये, तर एक मतदान केंद्र हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बनविले जाणार आहे. प्रभाग तीन मधील तिन्ही मतदान केंद्र हि शिशु मंदिर शाळेच्या वेगवेगळ्या खोली मध्ये असतील.प्रभाग चार मधील तिन्ही मतदान केंद्र हि जीवन शिक्षण मंदिर शाळेच्या वेगवेगळ्या खोलीत बनविली जात आहेत. प्रभाग पाच मधील दोन मतदान केंद्र हि भिसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील दोन खोल्यांमध्ये आणि तिसरे मतदान केंद्र हे भात संशोधन केंद्रात बनविले जात आहे.प्रभाग सहा मधील दोन मतदान केंद्र हि विठ्ठलनगर येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत तर एक मतदान केंद्र महिला मंडळाच्या विद्या विकास शाळेत आहे.प्रभाग सात मधील तिन्ही मतदान केंद्र हि अभिनव शाळेच्या वेगवेगळ्या खोली मध्ये असतील तर प्रभाग आठ मधील दोन मतदान केंद्र दहिवली येथील जनता शाळेतील वेगवेगळ्या खोलीत तसेच दोन मतदान केंद्र दहिवली येथील जिल्हा परिषद शाळेत बनविली जात आहेत. प्रभाग नऊ मधील तीन पैकी दोन मतदान केंद्र हि आकुरले येथील जिल्हा परिषद शाळेत तर तिसरे मतदान केंद्र हे आमराई येथील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आहे आणि प्रभाग दहा मधील पाच पैकी तीन मतदान केंद्र गुड शेफर्ड शाळेत तर दोन मतदान केंद्र गुंडगे येथील जिल्हा परिषद शाळेत बनविली जात आहे.

Exit mobile version