। तळा । प्रतिनिधी ।
तळा नगरपंचायत निवडणुकीच्या चार प्रभागात प्रचाराला चांगलाच वेग आला असून रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करून अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या 4 प्रभागात काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी मात्र प्रभाग 14 मध्ये पंचरंगी लढत होत आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून रोशनी निलेश तळेकर, प्रभाग क्रमांक 14 मध्ये रितेश मुंढे, तबस्सुम रहाटविलकर, लता मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवयानी मोरे, शिवसेनेचे योगेश शिर्के उतरले आहेत.
प्रभाग 10 मध्ये भाजपचे किशोर राष्ट्रवादीचे मंगेश शिगवण, शिवसेनेचे प्रवीण फोंडल, शेकापच्या संस्कृती वेदक रिंगणात उतरल्या आहेत. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रोशन तळेकर व संस्कृती वेदक यांच्या प्रचारफेरीत उपस्थिती दर्शविली. हे दोन प्रभाग अधिक प्रतिष्ठेचे असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मान्यवर प्रचाराला उतरले आहेत. या रणधुमाळीच्या तोफा दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता थंडावणार आहेत.