| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |
अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करताच ऑस्ट्रेलियाचे टी-20 विश्वचषकमधील आव्हान संपुष्टात आले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपली 15 वर्षाची दैदिप्यमान कारकीर्द संपवली.
वॉर्नरची तीनही फॉरमॅटमधून निवृत्तीडेव्हिड वॉर्नरची एकदिवसीय कारकीर्द ही विश्वचषक विजयाने संपली. भारतात गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावलं. डेव्हिड वॉर्नर हा एकदिवसीय विश्वचषकनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती झाला. त्याने पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी सामन्यानंतर कसोटीमधून निवृत्ती घेतली होती. आता टी -20 विश्वचषकनंतर तो टी -20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता. अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत गाठली. ऑस्ट्रेलियाचे टी -20 विश्वचषकमधील आव्हान संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाचा सुपर 8 मध्ये भारताने पराभव केला होता. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरचा तो शेवटचा आंतरराष्ट्रीय टी -20 सामना ठरला. शेवटच्या सामन्यात भारताविरूद्ध डेव्हिड वॉर्नरला फक्त 6 धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने त्याला अप्रतिम स्विंग गोलंदाजीवर बाद केलं. वॉर्नर बाद होऊन बाहेर जात असताना हा ऑस्ट्रेलियाकडून त्याचा शेवटचा सामना असल्याची जाणीव त्याला झाली नसेल. तो बाद झाल्यावर मैदानावर कोणतंही निरोपाचं वातावरण नव्हतं. त्याला स्टँडिंग ओवेशन मिळालं नाही. मात्र, अफगाणिस्तानने सामना जिंकताच वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट झाला.