इंग्लंडचा संघ घेणार मानसशास्त्रज्ञची मदत

| इंग्लंड | वृत्तसंस्था |

आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 20 संघ सहभागा होणार आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वच संघ कंबर कसत आहेत. इंग्लंडच्या संघाने तर चक्क फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीचा मानसशास्त्रज्ञ डेव्हिड यंग यांना करारबद्ध केले आहे. मँचेस्टर सिटीकडून यंग यांचा रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि यापूर्वीही त्यांनी इंग्लंड क्रिकेट संघासोबत काम केले आहे.

या रणसंग्रामासाठी 29 एप्रिलला न्यूझीलंडने संघ जाहीर केला आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा तो पहिला संघ ठरला. आतापर्यंत 19 संघांनी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. पाकिस्तान हा एकमेव देश आहे की ज्यांना अद्याप काही ठरवता आलेले नाही. मँचेस्टर सिटीने सलग चौथ्यांदा प्रीमिअर लीगचे जेतेपद जिंकले आहे आणि यात यंग यांची मोलाची भूमिका आहे. प्रीमिअर लीग क्लबसोबत काम करण्यापूर्वी यंग यांनी 2016 ते 2020 या कालावधीत इंग्लंडच्या सीनियर क्रिकेट संघासोबत काम केले होते. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी यंग हे इंग्लंडच्या संघासोबत काम करण्यास सुरुवात करतील आणि ते वर्ल्ड कप संपेपर्यंत संघासोबत असतील. इंग्लंडचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी 2019 मध्ये त्यांचा पहिला वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या संघासोबत यंग यांची उपस्थिती होती. मॉट म्हणाले, तो याआधी संघासोबत होता आणि तो आधीपासूनच चांगला सहयोगी आहे. तो अजूनही इतर भूमिका पार पाडत आहे, पण आम्हाला या मालिकेसाठी आणि वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तो मदत करणार आहे. इंग्लंड संघ: जॉस बटलर, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोप्ली, मार्क वुड

Exit mobile version