पुलाचा भराव गेला वाहून

काशिद, चिकणी गावाजवळील घटना
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
अलिबागवरून मुरुडकडे येताना काशीद-चिकणी गावाजवळील पुलाचा भराव खचून वाहून गेल्याने यावरून होणारी प्रवाशी वाहतूक धोक्यात आल्याचे सोमवारी सकाळी दिसून आले. हा पूल आधिच खचल्याने एकेरी वाहतुक सुरू होती. आता पुन्हा भराव खचल्याने हळूहळू रस्ताच वाहून जाईल असे दिसून येत आहे.
विहूर गावानजीक देखील पुलाचा भराव आणि दुरवस्था उडल्याने दोन महिन्यांपासून एकेरी वाहतूक सुरू आहे. मुळात मुरूड तालुका डोंगरांनी वेढलेला असून सर्व मार्ग हे पूर्वीच्या काळात डोंगरातून काढलेले आहेत. आता हा पर्यटन परिसर म्हणून मान्यता असल्याने वाहनांची वर्दळ खूपच वाढलेली आहे. अशा परिस्थितीत रस्ते खड्डेमुक्त आणि रुंद असायला हवेत. मात्र नेमकी उलटी परिस्थिती दिसून येत असून नवीन रस्ते देखील खड्ड्यांनी व्यापून गेले आहेत.जोडरस्ते असोत की बायपास सर्व रस्त्यावर खड्डेच दिसून येत आहेत. खड्ड्यांनी सर्वच हैराण झाले आहेत.

Exit mobile version