| मुंबई | प्रतिनिधी |
कुर्ला येथे बेस्ट बस अपघातात 19 वर्षीय आफरीन शाहचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नोकरीच्या पहिलाच दिवस तिच्यासाठी काळरात्र ठरली. आफरीन नोकरीचा पहिलाच दिवस असल्याने सकाळीच घरातून निघाली होती. मात्र, रात्र झाली तरी आफरीन घरी पोहचलीच नाही. नोकरीचा पहिला दिवस असल्यामुळे तिच्या घरातील सगळेच आनंदात होते. मात्र, हा तिच्या आयुष्यातील अखेरचा दिवस ठरेल याची कोणालाही कल्पना नव्हती. आफरिनचे नातेवाईक अब्दुल राशिद शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एकत्र कुटुंबात राहतात. गाडी चालवणारं कोणी घरी नव्हतं म्हणून तिला वडिलांनी चालत यायचा सल्ला दिला होता. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घटनास्थळावर आफरीनचा फोन मिळाला. त्या व्यक्तीने आफरीनच्या फोनमध्ये शेवटचा नंबरवर रिडाईल केलं. शेवटचा नंबर हा आफरीनच्या वडिलांचा होता. त्या नंबरवर कॉल करत सदर घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आफरीनचे नातेवाईक तात्काळ रुग्णालयात पोहोचले. पण, आफरीनच्या डोक्यावर, चेहर्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला होता.
पॉवर स्टेअरिंगमुळे घात?
लॉकडाऊननंतर संजय मोरे हा बेस्टमध्ये कंत्राटी वाहनचालक म्हणून कामाला लागला. तेव्हापासून ती लहान बस चालवायचा. त्यानंतर नुकतंच त्याला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. त्यापूर्वी त्याला 10 दिवसांचं ट्रेनिंगही देण्यात आलं होतं. मात्र, अपुरा अनुभव आणि माहिती असलेल्या संजय मोरेच्या हाती थेट इलेक्ट्रिक बसचं पॉवर स्टेअरिंग देण्यात आलं. कदाचित हेच या अपघाताचं सर्वात मोठं कारण ठरलं, असं बोललं जात आहे.