‘स्वराज्य’चा पहिला अधिकृत कार्यक्रम; संभाजीराजे छत्रपतींची घोषणा

। मुंबई । वृत्तसंस्था ।

राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या संभाजीराजेंनी स्वराज्य नावाच्या संघटनेची घोषणा केली होती. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या मावळ्यांना एकत्रित करण्यासाठी ही संघटना काम करेल असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर आता ऑगस्ट क्रांतीदिनाच्या निमित्ताने या संघटनेचा पहिला अधिकृत कार्यक्रम होणार आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या स्वराज्य या नव्या संघटनेचा अधिकृत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांतीदिनी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असून तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदीर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Exit mobile version