| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील खारपाले येथे श्री कृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही या निमित्ताने 28 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत सप्ताह सोहळा रंगणार असून, या सप्ताहाचे हे 174 वे वर्ष आहे. तसेच, या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत काकड आरती होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.00 ते 7.00 यावेळेत हरिपाठ, रात्री 9.00 ते 11.00 वाजण्याच्या सुमारास किर्तन होणार आहे. त्यानंतर रात्री 12.00 वाजल्यापासून सकाळी 4.00 वाजेपर्यंत हरिजागर हा धार्मिक सोहळा होणार आहे. तसेच, 29 ऑगस्ट रोजी नरेश जाधव, 30 ऑगस्ट रोजी जनार्दन महाराज, 31 ऑगस्ट रोजी युवा किर्तनकार सानिका मोरे, 1 सप्टेंबरला नंदु महाराज, 2 सप्टेंबरला वामन भोईर, 3 सप्टेंबरला अमीत महाराज आणि 4 सप्टेंबरला विक्रम थोरवे यांचे किर्तन होणार आहेत. तसेच, 5 सप्टेंबरला सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास दहीहंडी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती हनुमान ग्रामस्थ खारपाले यांनी दिली.






