। पुणे । प्रतिनिधी ।
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्यानंतर संघटनेची धुरा आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत असून त्या लवकरच पुण्यात राज्यस्तरीय बैठक घेऊन राज्यभरातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 6 सप्टेंबर रोजी ही राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.







