गुरांचा चारा हिरावला

| खांब | वार्ताहर |

गेली दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसाने हाहाकार तर उडविला आहेच याशिवाय या पावसाने गुरांचा चारा मात्र हिरावून घेतला आहे. पावसाच्या पाण्यावर आधारित रोहा तालुक्यातील खांब विभागातील शेतकरी उन्हाळी हंगामात भात पिकाची लागवड करतात. परंतु, शेती क्षेत्रावर विविध प्रकारच्या संकटांची मालिका सुरू असल्याने शेतकरी वर्गाने शेतीकडे पाठ फिरवली आहे. शेती करावी की नाही या द्विधावस्तेत शेतकरी वर्ग सापडला असतानाच. काही शेतकरी वर्गाने भातशेती ओसाड जाऊ नये, यासाठी आपापल्या जमिनी लागवडी खाली आणल्या. वाढत्या महागाईचा विचार न करता शेतकरी वर्गाने येईल त्या परिस्थितीत भात शेती पिकविली. परंतु, ऐन भात कापणीचा हंगाम सुरू होत नाही. तोच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झालेले पहावयास मिळाले. पावसाळ्यात गुरांसाठी उपयोगी पडणारा पेंढा पावसाने भिजल्याने गुरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Exit mobile version