लहान मुलांसाठी कोरोनाची चौथी लस

। नवीदिल्ली । वृत्तसंस्था ।
हैदराबादच्या स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच एक चांगली बातमी मिळल्याची भारतीयांमध्ये चर्चा आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाद्वारे स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीलाकाही अटींसह दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. या चाचण्या 5 ते 18 वर्षांच्या मुलांवर केल्या जातील. डीसीजीआयने विषय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे ही परवानगी देण्यात आली असून अशा प्रकारची परवानगी मिळालेली बायोलॉजिकल ई ही चौथी लस आहे.

देशातील बालकांसाठी उपलब्ध लशी
झायडस कॅडिला
ः-
12 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांवर वापरण्यास आपात्कालीन परवानगी देण्यात आली आहे.
सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड ः- दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. ही लस 2 ते 17 वर्ष वयोगटातील बालकांसाठी असेल.
भारत बायोटेकची कोवॅक्सिन ः- दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू असून ही लस 2 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी उपलब्ध असेल.
स्वदेशी बायोलॉजिकल ई ची लस ः- काही अटींसह या लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे. या चाचण्या 5 ते 18 वर्षांच्या मुलांवर केल्या जातील.

Exit mobile version