शेकापमार्फत मोफत लसीकरणाचा चौथा टप्पा यशस्वीपणे संपन्न

शेवटच्या दिवशी धोंडखार – दापोली गावातील लाभार्थ्यांचे लसीकरण
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील प्रयत्नाने सोमवारी (दि.11) शेकापमार्फत मोफत लसीकरणाचा चौथा टप्पा यशस्वीपणे संपन्न झाला. चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी रोहा तालुक्यातील धोंडखार – दापोली या गावातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. दापोलिचे उपसरपंच हरेश म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधुन व चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नातून सदर लसीकरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन हेमंत ठाकूर, शेकाप कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी, दापोली सरपंच अश्‍विनी मोरे, पुरोगामी अध्यक्ष जीवन देशमुख, भातसई सरपंच गणेश खरीवले, कृषी उत्पन्न बाझार समितीचे उपसभापती पांडुरंग ठाकूर आदी. मान्यवर उपस्थित होते.
या लसीकरणाचा पंचक्रोशितील ग्रामस्थांनी लाभ घेतला. शेकापच्या माध्यमातून या आधी मोफत लसीकरणाचे 3 टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली आहे.

Exit mobile version